Anti Corruption Trap Hadapsar : फेरफार नोंदीसाठी लाच मागणारा ‘ठकसेन’ गजाआड : हडपसर येथील कारवाईने महसूल विभागात खळबळ
पुणे, दि. 15 जानेवारी : महाराष्ट्र मिरर (मुबारक जिनेरी) Anti Corruption Trap Hadapsar
पुणे महसूल विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. फुरसुंगी हडपसर येथील जमीनीबाबत फेर नोंदीकरिता तलाठ्यासाठी लाच मागणारा ‘ठकसेन’ ॲण्टी करप्शनच्या कचाट्यात सापडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. Anti Corruption Trap Hadapsar
आरोपी खाजगी इसम ठकसेन उर्फ तुषार मारूती गलांडे, वय 42 वर्ष, रा.नारायण नगर, फुरसुंगी, हडपसर याच्याविरूद्ध लाच मागितल्या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Anti Corruption Trap Hadapsar
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार गट नं.309 सर्व्हे नं.138 मिळकतीसाठी फेरफार व सातबारा नोंदीसाठी पाठपुरावा करत होते. यावेळी फेर नोंदणीसाठी खाजगी इसम इसम ठकसेन उर्फ तुषार मारूती गलांडे यांनी तलाठी चौधरी यांच्यासाठी 10 हजार रूपयांच मागणी केली होती. याबबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती.
आज दि.15 रोजी तलाठी कार्यालय फुरसुंगी येथे ठकसेन गलांडे यांना 5 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत अधिक तपास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.