क्राईम न्यूज

Anti Corruption News | दस्त नोंदणी अधिकारी यांच्या नावाने पैसे घेणारा वकील अँटी करप्शनच्या जाळ्यात

  • पुण्यात दस्त नोंदणी अधिकारी यांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या वकिलांमध्ये खळबळ

पुणे, दि. १४ ऑगस्ट, (मुबारक जिनेरी) महाराष्ट्र मिरर : Anti Corruption News

सदनिका, जागा खरेदी करताना शासकीय फी व्यतिरिक्त दस्त नोंदणी अधिकारी यांच्या नावाने पैसे घेण्याचा ‘ट्रेंड’ खुलेआम सुरु असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याची दखल घेत खाजगी वकिलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकमाळ आळी, शिवाजी रस्त्यावर वकील माधव वसंत नाशिककर यांना लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले. खाजगी वकिलावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. Anti Corruption News

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांनी पत्नीच्या नावाने सदनिका खरेदी केली असून त्याची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय-१ हवेली येथे केली. दस्त नोंदणीसाठी आवश्यक असणारी शासकीय फी (स्टॅम्प ड्युटी, नोंदणी फी, कागदपत्र हाताळणी फी) ऑनलाईन जमा केली होती. यावेळी दस्त नोंदणीसाठी वकिल फी साठी वेगळे पैसे देण्यात आले होते. असे असताना देखील वकील माधव वसंत नाशिककर यांनी दस्त नोंदणी अधिकारी यांच्या नावाने ५ हजार रुपये मागणी केली.

याबाबत फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर दि. १३ रोजी वनराज रसवंती गृह शेजारी खडकमाळ आळी, शिवाजी रस्त्यावर तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. याबाबत Pune Police Khadak Police Station खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस निरीक्षक वीरनाथ माने Pi Virnath Mane तपास करत आहेत.

Anti Corruption News | Lawyer taking money in name of registration officer in anti-corruption net

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0