Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; तीन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले
Anti Corruption Bureau Arrested : लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर एसीबी जालना यांची यशस्वी कारवाई
छत्रपती संभाजी नगर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे Anti Corruption Bureau पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी यशस्वी कारवाई करत तीन शासकीय कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपींनी तक्रारदाराच्या कडे पंधरा हजाराची लाच मागितली होती. 15 हजारांची स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 26 फेब्रुवारी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.1)राहुल साहेबसिंग सुलाने (29 वर्ष) तलाठी सजा खुल्लोड तहसिल कार्यालय सिल्लोड रा.जाटवाड रोड छञपती संभाजीनगर, 2) विठ्ठल त्र्यंबक राठोड (34 वर्ष), कोतवाल, केडगाव ता. सिल्लोड जिल्हा छञपती संभाजीनगर, 3) राहुल खैरे यांना अटक करण्यात आली आहे. Anti Corruption Bureau
तक्रारदारांचे ट्रॅक्टर वाळूचे वाहन विहिरीवर टाकण्यासाठी आरोपी क्र. 3 द्वारे ताब्यात घेतले आहे. लाचेची मागणी पंचासमक्ष स्विकारली गेलेली आहे. आरोपी क्र. 1 आणि 2 यांनी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असून, यास रंगेहात पडण्यात आले आहे. आरोपी क्र. 1 आणि 2 यांना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Arrested
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी/ पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर ,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजी नगर,शंकर म. मुटेकर
पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. जालना,पोलीस अंमलदार गजानन कांबळे, गजानन खरात, अतिश तिडके, विठ्ठल कापसे,
अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना आवाहन
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
अॅन्टी करप्शन ब्युरो जालना कार्यालय
02452220252 मो. क्रं. 9011125553
टोल फ्री क्रमांक.1064*