खळबळजनक : आता पीएचडी करण्यासाठी पैशांची मागणी : भ्रष्ट प्राध्यापिका डॉ. माने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात
ANTI-CORRUPTION BUREAU Pune Arrested Prof Dr. Mane For Bribe : प्राध्यापिका डॉ. माने यांनी ऑनलाइन प्रबंध सादर करण्यासाठी मागितली होती लाच, 20 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
पुणे :- बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग BabuRavji Gholap College प्रमुखाचे कार्यालय,यातील तक्रारदार हे प्राध्यापक असून, त्यांनी अर्थशास्त्र मध्ये Ph. D. डिग्री प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन प्रबंध सावित्रीबाई फूले विद्यापिठ, पुणे करीता तयार केलेला आहे. प्रबंध सावित्रीबाई फूले विद्यापिठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका डॉ.शकुंतला माने यांची सावित्रीबाई फुले विद्यापिठाकडून SSPU University नियुक्ती झालेली आहे. तक्रारदार यांनी सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करुन पुन्हा सादर करणे व त्यावर अप्रुव्हल देणे यासाठी प्राध्यापिका डॉ. शकुंतला माने यांनी तक्रारदार यांचेकडे 25 हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती. ANTI-CORRUPTION BUREAU
तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, प्राध्यापिका डॉ. शकुंतला माने यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष वरील कामकाजसाठी 25 हजाराची रुपयाची लाच रक्कमेची मागणी केली आज (30 मार्च 2024) रोजी लोकसेविका शकुंतला माने यानी तक्रारदार यांचेकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून रुपये 20 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत. ANTI-CORRUPTION BUREAU