Anti Corruption Bureau News : लाचखोर डॉक्टर मालामाल ; दहा वर्षात कोट्यावधीची माया गोळा केली
Anti Corruption Bureau Raigad News : लाच स्वीकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दहा वर्षांमध्ये कोट्यावधीची संपत्ती गोळा केल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आरोप
रायगड :- डॉ. विजय एकनाथ गवळी, तत्कालिन वैद्यकिय अधिकारी, उप जिल्हा रुग्णालय पेण,(जि. रायगड) (वर्ग 2) यांचेविरुध्द 19 सप्टेंबर 2018 रोजी पेण पो.स्टे. गु.र.नं. भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम सन 2018 चे कलम 7 प्रमाणे 19 सप्टेंबर रोजी लाच मागणी करूम, लाचेच्या रक्कमेचे स्वीकार केल्याबददल गुन्हा दाखल झालख होता. त्यानंतर डॉ. गवळी व कुटुंबियांनी संपादित केलेल्या मालमत्तेची उमड चौकशी करण्यात आली. उघड चौकशीमध्ये आरोपी लोकसेवक डॉ. विजय एकनाथ गवळी, यांचे व त्यांची पत्नी वर्षा विजय गवळी यांचे परिक्षण कालावधी दिनांक 1 जानेवारी 2008 ते 19 सप्टेंबर 2018 पर्यंतचे एकूण उत्पन्न, खर्च व मालमत्ता यांची सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी (परिक्षणा कालावधी) शासकीय नोकरीचे कालावधीत आपले पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून त्यांचे स्वतःचे व कुटुंबियांचे नावे 1 कोटी 52 लाख 40 हजार 530 रूपये किंमतीची अपसंपदा (एकूण उत्पन्नाच्या 44.56 टक्के) संपादित केली असल्याचे निष्पन्न झाले. Anti Corruption Bureau Raigad News
त्यावरून डॉ. विजय एकनाथ गवळी, (57 वर्षे), तत्कालीन वैद्यकिय अधिकारी, उप जिल्हा रूग्णालय पेण, व त्यांची पत्नी सौ.वर्षा विजय गवळी, (54 वर्षे), अधिपरिचारिका, उप जिल्हा रुग्णालय पेण (दोन्ही रा. वर्षा बंगला, शंकर नगर, पेण, ता.पेण, ) जिल्हा-रायगड यांचेविरुध्द पेण पोलीस ठाण्यात Anti Corruption Bureau Raigad News
, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 (संशोधन 2018) से कलम 13(1) (व) सह 13(2) प्रमाणे दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड अलिबाग हे करीत आहेत. Anti Corruption Bureau Raigad News