क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai News : नवी मुंबईत देहविक्रय अड्ड्यावर छापा; एका अल्पवयीन मुलीसह सात जणींची सुटका

Navi Mumbai Sex Racket Busted News : तळोजा एमआयडीसीतील हॉटेल ‘नवनाथ इन’वर गुन्हे शाखेची कारवाई; मालकासह तिघांना अटक

नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) रविवारी मोठी कारवाई केली. तळोजा एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल नवनाथ इन’ या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सहा पिडीत महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि वेटरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Navi Mumbai Sex Racket Busted News

बनावट ग्राहकाद्वारे सापळा

तळोजा एमआयडीसी येथील हॉटेल नवनाथ इनचा मॅनेजर ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांना देहविक्रयासाठी उपलब्ध करून देत असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. वेटरने या ग्राहकाकडून 2000 रुपये स्वीकारून पसंतीची महिला निवडण्यास सांगताच, इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

अल्पवयीन मुलीसह बांगलादेशी महिलांची सुटका

या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची आणि सहा महिलांची सुटका केली. विशेष म्हणजे, या सहा महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी या पीडित मुलींना आणि महिलांना आर्थिक आमिष दाखवून आणि प्राप्त करून घेऊन त्यांना लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवले होते.

मालकासह तिघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा

याप्रकरणी पोलिसांनी लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस हवालदार मांडोळे, सविता म्हात्रे, मनीषा पावडे आणि पोलीस शिपाई ठाकूर, चव्हाण, पारासुर, कोलते व हाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0