पुणे

Anjali Damniya : ‘तुम्ही चांगले काम करता, पण परवानगी नाही!’ पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन पाहणीसाठी गेलेल्या अंजली दमानियांना अडवले

Anjali Damania On Ajit Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘डायरेक्टर’चा उद्धटपणा, दमानियांचा अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्या कथित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात गंभीर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज (18 नोव्हेंबर) प्रत्यक्ष ती वादग्रस्त जमीन पाहणी करण्यासाठी मुंढवा येथे पोहोचल्या होत्या. मात्र, त्यांना गेटवरच अडवण्यात आले.

दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेटवर उपस्थित लोकांनी त्यांना ‘तुम्ही चांगले काम करतात, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसणार, तोपर्यंत आत सोडता येणार नाही,’ असे सांगितले. त्यांनी तेथील ‘डायरेक्टर’चा नंबर घेऊन फोनवर संपर्क साधला, पण त्या व्यक्तीने अत्यंत उद्धटपणे बोलून पाहणीसाठी आत जाण्याची परवानगी स्पष्टपणे नाकारली. दमानिया यांनी आरोप केला की, “कोणाचे फोन आले, कोणी त्यांना परवानगी देऊ दिली नाही, मला माहिती नाही.”

या पाहणीदरम्यान दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? अजित पवारांनी राजीनामा द्यावा.” दमानिया यांनी या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करताना म्हटले की, “हा व्यवहार अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे देखील रद्द करू शकत नाहीत. कारण यात फसवणूक झाली आहे.” जर हा व्यवहार रद्द केला, तर मी कोर्टात चॅलेंज करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दमानिया यांना तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती आणि 16 तारखेला इथे येऊन ‘तमाशे’ करणारे लोक कोण होते, याची चौकशी करायची होती. मात्र, आतमध्ये जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे ‘केंद्र सरकारचा अधिकारी होता, त्याने माझ्यासोबत अत्यंत वाईट प्रकारे संवाद साधला,’ असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

दमानिया यांना आतमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0