मुंबई

Anjali Damania On Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा अजित पवारांवर नवा ‘बॉम्ब’! 500 कोटींचे शताब्दी रुग्णालय नातेवाईकांच्या घशात? फडणवीसांवरही संताप

•’पीपीपी’ तत्त्वाने 580 बेडचे हॉस्पिटल राणा पाटलांच्या ट्रस्टला देण्याचा घाट; ‘अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घाला’: दमानियांची थेट मुख्यमंत्र्यांना टीका

मुंबई :- पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. मुंबई महानगरपालिकेने 500 कोटी खर्च करून उभारलेले गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय आता अजित पवारांच्या नातेवाईकांच्या ट्रस्टला ‘पीपीपी’ तत्त्वावर चालवण्यासाठी दिले जात असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी एक्स (X) वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. 580 बेडचे हे भव्य रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वाने चालवण्यासाठी देण्याचा घाट घातला गेला आणि योगायोगाने यात पद्मसिंह पाटील (जे अजित पवारांच्या पत्नी, खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत) यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने बोली लावली आहे. या ट्रस्टचा कारभार आमदार राणा जगजीतसिंह पाटील (अजित पवारांचे पुतणे) पाहतात.

“आता आणखी एक 500 कोटी रुपयांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना?” असा संतप्त सवाल दमानिया यांनी केला आहे. त्यांनी केवळ अजित पवारांवरच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. “मुख्यमंत्री फडणवीसची, तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा,” अशा तिखट शब्दांत दमानिया यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

राज्यात तयार रुग्णालये ‘पीपीपी’ मॉडेलच्या नावाखाली एकाच राजकीय कुटुंबाच्या हाती सोपवण्याच्या कथित प्रयत्नांवरून हा वाद आता चांगलाच पेटला आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago