Anjali Damania On Parth Pawar : ’42 कोटी देऊनही व्यवहार रद्द होत नाही’; पार्थ पवार यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई :- पुण्यातील कोरेगाव पार्क Pune Koregaon Park Land Scam येथील कथित महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार Parth Pawar अडचणीत सापडले आहेत. अजित पवार Ajit Pawar यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले असले तरी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damania यांनी हा मुद्दा उचलून धरला असून, आज (दि. 12) पत्रकार परिषद घेऊन थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची आणि पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दमानिया यांचे महत्त्वाचे आक्षेप आणि मागण्या
चौकशी समितीवर प्रश्न
दमानिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीवरच प्रश्नचिन्ह उभे केले. त्या म्हणाल्या की, चौकशी समितीत 6 पैकी 5 सदस्य पुण्यातील आहेत. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना, ही समिती निष्पक्ष चौकशी करू शकेल का? यामुळेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा: या व्यवहारात 99 टक्के भागीदारी पार्थ पवारांच्या कंपनीची असल्याने, पार्थ पवार यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
व्यवहार रद्द करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप
दमानिया यांनी अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ‘व्यवहार रद्द’ करण्याच्या निर्णयावर कायदेशीर आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, कोणत्याही जमिनीचा व्यवहार रद्द करताना जागेचे मालक किंवा खरेदीदार व्यवहार रद्द करू शकतात. परंतु, शिवानी तेजवानी या जागेच्या मालक नसल्याने त्यांना गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार पार्थ पवार किंवा त्यांची कंपनी देखील हा व्यवहार रद्द करू शकत नाही.
‘चोरीचा माल परत करणे’ दमानिया म्हणाल्या, “व्यवहार रद्द करतो म्हणणे हे चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्याप्रमाणे आहे.”
जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे.
कायदेशीर त्रुटी कोरेगाव पार्कमधील 1804 कोटींची जमीन 300 कोटींना घेण्यात आली आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी भरली गेली नाही, असा आरोप दमानिया यांनी केला. महार वतनाची जमीन खालसा झाल्यानंतर गायकवाड कुटुंबाला ती जमीन परत कधीही दिली गेली नाही. असे असताना पॉवर ऑफ अटॉर्नी (नोंदणीकृत नसतानाही) देऊन कोरेगाव पार्कमधील जमिनीचा व्यवहार कसा करू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अंजली दमानिया यांनी काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दिली आहेत. त्यांच्या या नवीन खुलाश्यांनंतर राज्यातील राजकीय आणि कायदेशीर वातावरण तापले आहे.
या गंभीर आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…