मुंबई

Anil Parab : “मंत्रीच सुरक्षित नाहीत, मग जनतेची सुरक्षा कशी?” – अनिल परबांचा विधान परिषदेत सरकारला टोला

Anil Parab On Maharashtra Sarkar : “चड्डी-बनियान गँगचे व्हिडीओ फिरतायत, मंत्र्यांचे बेडरूम व्हिडीओ बाहेर येतायत”

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेल्या ‘जन सुरक्षा विधेयका’वरून विधान परिषदेतील वातावरण चांगलेच तापले. उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब Anil Parab यांनी सरकारवर घणाघाती टीका करताना “मंत्रीच सुरक्षित नाहीत, मग जनतेला कशी सुरक्षा देता?” असा थेट सवाल केला. त्याचबरोबर त्यांनी ‘चड्डी-बनियान गँग’ आणि मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडीओ प्रकरणांची आठवण करून देत सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला.

परब म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी जन सुरक्षा विधेयक आलं. जनतेच्या सुरक्षेची चर्चा झाली, पण मंत्र्यांचेच बेडरूम व्हिडीओ बाहेर येतात म्हणजे तेच असुरक्षित आहेत. त्यामुळे आधी मंत्र्यांना सुरक्षा द्या, मग जनतेचा विचार करा.”ते पुढे म्हणाले, “मंत्र्यांच्या बेडरूममध्ये काय सुरु आहे, हे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून बाहेर येतंय. हे म्हणजे यंत्रणा पोखरली गेली आहे. जनतेपेक्षा आधी सरकारमध्ये सुरक्षेची गरज आहे.”

अनिल परब यांच्या विधानावर सभागृहातून लगेच प्रतिक्रिया उमटल्या. काही सदस्यांनी “मग मंत्री बेडरूममध्ये सूट घालून झोपायचे का?” असा उपरोधिक सवाल केला. त्यावर उत्तर देताना परब म्हणाले, “मी सूट घाला म्हणत नाही, पण बेडरूमपर्यंत यंत्रणा पोहोचते म्हणजे गोष्ट गंभीर आहे.”

त्यांनी 289 अंतर्गत स्थगन प्रस्ताव सादर करत सरकारकडे या प्रकारावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. “जर मंत्रीच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य माणूस कुठं सुरक्षित राहील?” असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारला ‘मूलगामी सुरक्षा’ पुरवण्याचा सल्ला दिला.

vivek

Recent Posts