मुंबई
Trending

Anil Gote : माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश

Dhule City Vidhan Sabha : भाजपाचे माजी आमदार आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले अनिल गोटे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे

मुंबई :- भाजपाचे माजी आमदार आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल गोटे Anil Gote यांनी शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत प्रवेश केला आहे. विधानसभेच्या निवडणुका Dhule City Vidhan Sabha जाहीर झाल्यापासून मातोश्रीवर पक्षप्रवेशाकरिता इतर पक्षातील नेतेमंडळीची तसेच माजी आमदारांची रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटात हाती शिवबंधन बांधत प्रवेश केला आहे. या पक्षात प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, उपनेते अशोक धात्रक इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोण आहे अनिल गोटे?

अनिल गोटे यांनी 1999 मध्ये समाजवादी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षात फूट पाडण्याच्या आणि तत्कालीन सरकारला कमकुवत करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग होता. 2009 मध्ये धुळ्यासाठी ते भाजपचे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आणि ऑक्टोबर 2014 मध्ये कमी बहुमताने ते पुन्हा निवडून आले. 30 मार्च 2017 रोजी गोटे यांनी महाराष्ट्र विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी या परिषदेला घटनात्मक अधिकार नसल्याच्या आधारे केली होती.

तेलगीच प्रकरण अनिल गोटे यांचे नाव
अब्दुल करीम तेलगीचा बनावट स्टॅम्प आणि स्टॅम्प पेपर छापणे आणि विक्री करण्याच्या कथित योजनेच्या संदर्भात , गोटे यांना जुलै 2003 मध्ये अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले . त्याची जून 2007 मध्ये 10 लाखांच्या जामिनावर सुटका झाली, तर अन्य आरोपी सूर्यवंशी याला 50,000 रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने 2011 मध्ये डिस्चार्जसाठी त्याचा अर्ज फेटाळला, परंतु ऑक्टोबर 2014 पर्यंत त्याला आरोपांबद्दल दोषी ठरविण्यात आले नव्हते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0