Anil Deshmukh : सीबीआय गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, ‘मी भाजपचा …’
•माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता सीबीआयने गिरीश महाजन प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर :- सीबीआयने माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, अशा धमक्या आणि दबावाला मी अजिबात घाबरत नाही, असे म्हणत अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्यावर दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यासाठी सीबीआयने अनिल देशमुख यांना आरोपी बनवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मी न घाबरता लढेन – अनिल देशमुख
धन्यवाद…
देवेंद्रजी फडणवीस
माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.
महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !