Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांनी मागितला देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
•पुणे प्रकरणा वरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली असून, माजी गृहमंत्र्यांनी आताचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार ? असा प्रश्न उपस्थित झालाय
पुणे :- एक अल्पवयीन श्रीमंत मुलगा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करतो. दारूच्या नशेत तो त्याच्या वडिलांच्या २ कोटी रुपयांच्या पोर्शमधून बाहेर पडतो आणि दुचाकीला धडकतो. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 15 तासांत जामीन मिळतो. जामिनाची अटही अशी आहे की नवीन मोटार वाहन कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला व्हीआयपी ट्रिटमेंटही दिल्याचा आरोप होत आहे.त्याला खाण्यासाठी पिझ्झा आणि बर्गर देण्यात आला. याबाबत सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले असून लोकांनी अल्पवयीन मुलाच्या जामीन आणि सुटकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडींवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. या सर्व घटनेवर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.
माजी गृहमंत्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये गाडीखाली कुत्रा आला तरी हे राजीनामाचे मागणी करणारे विरोधक आहे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस ला आता या घटनेनंतर राजीनामा देणार का असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
अनिल देशमुख म्हणाले की,देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील…आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी).देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?