क्राईम न्यूज

Anil Deshmukh Case : खळबळजनक गौप्यस्फोट..!!अनिल देशमुख पीए माध्यमातून पैसे घ्यायचे… सचिन वाझे

Sachin Waze On  Jayant Patil : बडतर्फ पोलीस अधिकारी आणि शंभर कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांचे आरोप, अनिल देशमुख हे त्यांच्या पी ए माध्यमातून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप

मुंबई :- बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि शंभर कोटीची खंडणी प्रकरणातील तसेच अँटिलीया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी असलेले सचिन वाझे Sachin Waze यांनी पुन्हा एकदा खळबळ जनक गौप्यस्फोट केला आहे. तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh हे त्यांच्या पीए च्या माध्यमातून पैसे घेत असल्याचा आरोप सचिन वाझेनी Sachin Waze केला आहे. देशमुख सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिले आहेत.

जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.

अनिल देशमुख काय म्हणाले?

अनिल देशमुख म्हणाले की, सचिन वाझेच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले असताना त्याला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर वाझेच्या माध्यमातून आरोप लावत आहे.

अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, हायकोर्टाने सचिन वाझेबद्दल बोलताना म्हटले की, हा व्यक्तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याला दोन खूनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आताही एका खूनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवण्यासारखा हा व्यक्ती नाही असे हायकोर्टाने म्हटल्याचे देशमुखांनी सांगितले आहे.काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, त्यातून जी वस्तूस्थिती समोर आणली. त्यानंतर सचिन वाझे जे बोलले ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

सचिन वाझे सांगत असलेले पुरावे काय आहेत? ते कधी आणि कशाप्रकारे बाहेर येणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणी यामुळे वाढताना दिसताय.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago