Andheri Accident News :सुरक्षेच्याf उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह, दोन दिवसात तीन दुर्घटना
मुंबई | अंधेरी (पूर्व) येथील कदमवाडी परिसरात साईलीला बिझनेस पार्कच्या मागे सुरू असलेल्या बांधकामस्थळी सोमवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली.Andheri Building Accident इमारतीच्या पाया खोदकामादरम्यान अचानक बाजूची माती कोसळून एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे चार तास सुरू ठेवलेल्या शोध मोहिमेनंतर रात्री उशिरा कामगाराचा मृतदेह सापडला. Andheri Latest News
ही घटना संध्याकाळी 7.43 वाजता घडली. मुसळधार पावसामुळे माती सैल झाल्याने ती अचानक कोसळली आणि कामगार तिच्या खाली गाडला गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका, पोलीस आणि 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अखेर रात्री 11.45 वाजता मृतदेह सापडला. कुपर रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या अपघातानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रविवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन दिवसात शहरात घडलेल्या विविध तीन दुर्घटनांमध्ये चार जण जखमी झाले आहेत. जोगेश्वरी येथे बांधकाम सुरू असलेल्या परांछीची संरक्षक भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या असून, त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, ताकपाडा येथील अरेस्टल इमारत परिसरात सोमवारी सकाळी झाड पडून एक व्यक्ती जखमी झाला.
या घटनांनी प्रशासनाच्या दक्षतेवर तसेच नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…