मुंबई

Anand Ashram Viral Video : आनंद आश्रमात नोटा उधळण्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटांनी केले पोस्ट, केदार दिघे यांनी व्यक्त केल्या भावना

•तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…. केदार दिघे यांची पोस्ट

ठाणे :- धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सोशल माध्यमावर शेअर केला आहे. यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया समाजमध्यमांवर नोंदविली आहे.

कार्यालयात नोटा उधळतानाची एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात वाजवत होते. त्यावेळी त्यांच्यावर टेंभीनाका शाखाप्रमुख निखिल बुडजूडे आणि पोलिस लाईन शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली. त्याची व्हिडिओ समाजमध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे. “तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…आमचा आनंद हरपला ” अशी प्रतिक्रिया केदार यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

आनंद दिघे यांची परंपरा आणि त्यांनी सुरू केलेले उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत. गणपती विसर्जनानंतर ढोल पथके आनंद दिघे यांना भेटण्यासाठी टेंभीनाक्यावर यायची, तेव्हा दिघे हे त्यांना बक्षिस द्यायचे. ही दरवर्षीची प्रथा आहे. परंतु काही लोक आनंद आश्रमातील व्हिडीओ चुकीचे पद्धतीने प्रसारित करत आहेत. तसेच कार्यकर्त्यांची पैसे वाटण्याची पद्धत चुकीची असल्याने त्यांच्यावर पक्षाने करवाई केली आहे. मात्र ज्यांना ओवाळून टाकले, त्यांनी आम्हाला दिघे साहेब काय आहेत हे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0