मुंबई, २५ ऑगस्ट:– मुंबईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, सी.बी. कंट्रोल गुन्हे शाखेने अँन्टॅाप हिल परिसरात धाड टाकली. या कारवाईत तब्बल ५५० किलो चीझ अॅनालॉग पदार्थ पनीर म्हणून विक्रीसाठी ठेवलेला जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह ही छापेमारी केली. “ओम कोल्ड्रीक हाऊस” आणि “श्री गणेश डेअरी” या दोन दुकानांत तसेच दुकानाबाहेरील सुझुकी सुपर कॅरी या टेम्पोत संशयास्पद स्वरूपात साठवलेले पनीरसदृश पदार्थ सापडले. तपासात तो पदार्थ चीझ अॅनालॉग असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे चीझ अॅनालॉग ?
Food Safety & Standards Authority of India (FSSAI) नुसार, जे पदार्थ खऱ्या चीजशिवाय बनवलेले असतात आणि चीजसारखे दिसतात, त्यावर “Cheese Analogue” असे स्पष्ट लेबल असणे आवश्यक आहे. परंतु, कारवाईत आढळलेले पनीरसदृश पदार्थ हे लेबलविरहित होते.
चीझ अॅनालॉग हा पदार्थ दुधाऐवजी दुधाची पावडर, हलक्या प्रतीचे पाम तेल व रासायनिक घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरासारखा असला तरी पोषणमूल्य कमी असल्याने आरोग्यास अपायकारक ठरतो. खरी मलईयुक्त पनीरात प्रथिने, कॅल्शियम व निरोगी चरबी असते; मात्र या पदार्थात ते घटक अल्प प्रमाणात आढळतात.
नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सूचित केले आहे की –
पनीर व दुग्धजन्य पदार्थ फक्त विश्वासार्ह दुकानातून व लेबल तपासून खरेदी करावेत. सैल किंवा लेबलविरहित पदार्थ खरेदी टाळावेत. खरे पनीर दाणेदार पोताचे व नैसर्गिक दुधाच्या वासाचे असते, तर बनावट पनीर मेणासारखे व सपाट लागते. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यास अन्नविषबाधा व गंभीर आरोग्य धोके संभवतात.
संशयास्पद विक्री अथवा साठा आढळल्यास त्वरित १०० क्रमांकावर माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. व्यापाऱ्यांना कडक इशारा देत पोलिसांनी सांगितले आहे की, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन व पोलीस उपायुक्त (प्रतिबंधक) कजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, स.पो.नि. रोहन बगाडे, स.पो.नि. महेश सांगळे, पोउपनि. नंदकिशोर बोरोले, म.फी. प्रकाश आव्हाड, पो.ह. गणेश डोईफोडे, म.पो.ह. रिचा मोवेकर, पो.शि. संदीप वावळ, म.पो.शि. अर्चना कासारकर व पो.शि. आकाश पवार यांनी सहभाग घेतला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…