Amritsar-Mumbai Train Bomb Threat : अमृतसर – सीएसएमटी एक्स्प्रेसमधून येणाऱ्या पार्सलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ!
Amritsar-Mumbai Train Bomb Threat : अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये आलेल्या पार्सलमध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. यानंतर बॉम्बशोधक आणि श्वान पथक तेथे पोहोचले आणि झडती घेतली असता एका गोणीत फटाक्यांनी भरलेले दोन बॉक्स सापडले.
मुंबई :- अमृतसर-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 11058 अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून येणाऱ्या पार्सलमध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. Amritsar-Mumbai Train Bomb Threat मंगळवारी सकाळी 10.30 वाजता जीआरपी नियंत्रण कक्षाला ही माहिती मिळाली.त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफचे जवान बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकासह तात्काळ वाडीबंदर येथील पार्सल कार्यालयात पोहोचले.
यानंतर पार्सल व्हॅनची कसून तपासणी केली असता एका गोणीत फटाक्यांनी भरलेले दोन बॉक्स आढळून आले. दोन्ही बॉक्समध्ये 30 फटाके बॉम्ब ठेवण्यात आले होते. अशा स्थितीत पार्सल बुकिंग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रेनमध्ये ज्वलनशील-स्फोटक पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. कारण असे छोटे फटाकेही मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात. मात्र, पार्सल व्हॅनमध्ये फटाक्यांच्या दोन पेट्या कशा आल्या, याचा तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती टॉईज, क्रॉफर्ड मार्केट, गेट क्रमांक 5, पहिला मजला, दुकान क्रमांक 385 या संशयास्पद पार्सलच्या पोत्यावर मार्करने लिहिलेले होते, ज्यामध्ये स्फोटके असल्याची माहिती मिळाली होती एका खासगी कंपनीने पार्सल कंपनीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.