महाराष्ट्र

Amol Mitkari : अमोल मिटकरी यांची कार मनसैनिकांनी फोडली

Amol Mitkari car was broken by MNS: अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला, अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे वर केली होती टीका

अकोला :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी पुण्यामधील पूर परिस्थिती नंतर आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी राज ठाकरे यांना सुपारी बहाद्दर अशी टीका केली होती. पडसाद म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकोल्याच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची कार फोडली आहे. car was broken by MNS अमोल मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी ही आज सकाळपासूनच अमोल मिटकरी यांचा चांगला समाचार घेतला आहे.

अमोल मिटकरी यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. त्यांनी नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात कुठे तरी भेट दिली आहे. ज्यांना साधा एनडीआरएफचा फुलफॉर्म माहिती नाही, त्यांनी आपत्ती व्यवस्थापनावर बोलावे, हा अलीकडच्या राजकारणातला सर्वात मोठा विनोद आहे. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असे कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही. त्यांची विश्वासार्हता आता संपली आहे, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सुर्याला वाकोल्या दाखवल्यासारखे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0