मुंबईठाणे
Trending

Amol Mitkari : अजित पवार अपघात की घातपात? अमोल मिटकरींचा ‘सुसाईड बॉम्बर’चा दावा; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Amol Mitkari On Ajit Pawar : पायलट सुमित कपूर जिवंत आहे का? मूळ वैमानिक ट्रॅफिकमध्ये अडकल्याच्या थिअरीवर मिटकरींचा सवाल | अधिवेशनाच्या दिवशी दादांच्या आठवणीने डोळे पाणावले

मुंबई :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनानंतरचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. ज्या अर्थसंकल्पाची तयारी खुद्द अजित पवार करत होते, तोच अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे या विमान अपघाताभोवती संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे. “अजित पवारांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर हा ‘सुसाईड बॉम्बर’ होता का?” असा थेट सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

राजीव गांधी हत्येचा दिला दाखला
अमोल मिटकरी यांनी या घटनेची तुलना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येशी केली आहे. ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे लिट्टेने राजीव गांधींची हत्या केली, त्याच धर्तीवर अजित पवारांचा काटा काढण्यात आला का? हा अपघात नसून एक नियोजित घातपात असावा, अशी शंका घेण्यास वाव आहे.” सुमित कपूर या वैमानिकाच्या पत्नीचा हवाला देत, मिटकरी यांनी सुमित कपूर खरोखरच मृत पावला आहे की तो जिवंत आहे, असा प्रश्न विचारून तपास यंत्रणांना पेचात पाडले आहे.

वैमानिक बदलले की बदलण्यात आले?

अपघाताच्या दिवशीच्या घटनाक्रमावर बोट ठेवत मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अजित पवारांच्या विमानासाठी आधी ठरलेले वैमानिक साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूक कोंडीत अडकले होते का? की त्यांना मुद्दाम बाजूला सारण्यात आले?

विमानाचा ब्लॅक बॉक्स बाजूला ठेवा, पण विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अद्याप सार्वजनिक का करण्यात आले नाही?

शेवटच्या क्षणी पायलट सुमित कपूरची नियुक्ती कोणाच्या सांगण्यावरून झाली?

अधिवेशनात अजित पवारांची उणीव
28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ झालेल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणीने आज विधानभवन परिसरात प्रत्येक जण भावूक झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांच्या कामाचा गौरव केला, मात्र अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे अधिवेशनाचे कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनीही या प्रकरणात सातत्याने वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मिटकरी यांच्या या दाव्यामुळे आता राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0