महाराष्ट्र
Trending

Amol Mitkari : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावण्यावरून वाद, आता आमोल मिटकरींनी घेतली दिलगिरी; ‘ती माझी वैयक्तिक भूमिका होती,’ म्हणत घेतला ‘यू-टर्न’

Amol Mitkari On IAS Officer : उपमुख्यमंत्र्यांवरून सुरू झालेल्या वादामध्ये मिटकरींनी थेट महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; आता ‘एक्स’वर व्यक्त केली दिलगिरी

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठा राजकीय वाद उफाळून आला होता. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या या महिला अधिकाऱ्याच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधकांनी अजित पवारांवर केला होता. यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आता त्यांनी आपल्या भूमिकेपासून ‘यू-टर्न’ घेतला असून, जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे.

आमदार मिटकरी यांनी या प्रकरणात थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) पत्र पाठवून महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी थेट पूजा खेडकर प्रकरणाची आठवण करून देत, ‘अंजना कृष्णा यांची नियुक्तीही बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का?’ असा संशय व्यक्त केला होता. तसेच, ज्या अधिकाऱ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत, हे कळत नाही, तो अधिकारी कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

त्यांच्या या भूमिकेवर मोठी टीका झाल्यानंतर आता मिटकरी यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची नव्हे, तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0