पुणे

विजयाची तुतारी फुंकायची…!खासदार अमोल कोल्हे

Amol Kolhe Target Ajit Pawar Group : शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटासह महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधला .

पुणे :- आज (एप्रिल 18) महाविकास आघाडीची MVA सभा पार पडली. बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, MVA Supriya Sule पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.आता फक्त ट्रेलर दाखवतो. पिक्चर दाखवायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे. बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुंकायची हे आता महाराष्ट्रातील जनतेचे ठरले आहे. मी पहिल्यांदा संसदेत गेलो तेव्हा मला सुपिया सुळे Supriya Sule यांनी सांगितले होते की, जेव्हा जनतेच्या धोरणाविषयी चर्चा होईल, देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा राहा. तुझा आवाज सर्व सामान्य लोकांसाठी गरजला पाहिजे, हे सुप्रिया सुळेंनी मला शिकवले होते”, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अमोल कोल्हे म्हणाले, “आता पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून देशाच्या धोरणांविषयी बोलले जात नाही. वैयक्तिक टीका केली जाते. परवा कुणीतरी विचारले नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे. मी त्यांना सांगितले की, नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही”, अशी टीका अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली आहे.

अजित पवार यांनी EVM वर केलेल्या विधानाचा देखील अमोल कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबा, पाहिजे तेवढा निधी देतो. मात्र कर काय ह्यांच्या खिशातील आहे का? आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता आणि त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का? असा सवाल देखील अमोल कोल्हेंनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0