महाराष्ट्र

Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर करत दिले उत्तर..!

Amol kholhe Shared Ajit Pawar Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती

पुणे :- लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच राज्यातलं राजकीय वातावरण सध्या तापू लागले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी जाहीर सभेत खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol kholhe यांनी उत्तर दिले. एखाद्या मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही तर तेथे सेलिब्रिटी उमेदवार दिला जातो, असे म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. मतदार संघात काम करायला त्यांना वेळ नसल्याचे देखील अजित पवार म्हणाले होते. यावर अमोल कोल्हे यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ ट्विट करत अजित पवार यांना दिले प्रत्युत्तर

अजित पवार यांना उत्तर देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की, अजित पवार यांनी अभिनेता गोविंदा, अमिताभ बच्चन, हेमामालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणे दिली आहेत. जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो असे अजित पवार म्हणाले. मात्र, या सेलिब्रिटींमध्ये आणि माझ्यात मोठा फरक असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितलं. यातील एकाही खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही. मात्र, मला तीन वेळा पुरस्कार मिळाला असल्याची आठवण अमोल कोल्हे यांनी करून दिली. इतकच नाही तर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील संसदेचे प्रतिनिधी आहेत. ते लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. मात्र त्यांची कामगिरीपेक्षा माझी कामगिरी उजवी असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

वास्तविक अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने त्यांना उत्तर देणे उचित नाही. परंतु त्यांनी माझ्यावर वैयक्तिक भाष्य केले आहे, त्यामुळे मला उत्तर देणे क्रमपात्र असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले. मी त्यांच्याकडे राजीनामा देण्याचा विचारत होतो,

मला त्यांच्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार माझ्या दहा वेळेस मागे लागले.सातत्याने सेलिब्रिटी खासदार म्हणून माझ्यावर टीका करणारे अजित पवार हे मला एकांतात स्वतःच्या पक्षात येण्यासाठी ऑफर का देत आहेत? त्यासाठी गुप्त बैठका का घेतल्या जात आहेत? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. त्यांच्या पक्षात घेण्यासाठी ते माझ्या दहा वेळेस मागे लागले असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना ही मीच राबवत होतो. विधानसभेच्या प्रचारात देखील आपण एकत्र होतो. तुमची शिखर बँक प्रकरणात चौकशी सुरू असताना देखील आपण ही यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने पूर्ण केली असल्याची आठवण, अमोल कोल्हे यांनी करून दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचा जुना व्हिडिओ केला ट्विट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0