मुंबई

Amol Kirtikar : ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर ईडी कार्यालयात

Amol Kirtikar ED Summons शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, उमेदवारी जाहीर होताच ईडी कडून समन्स

मुंबई :- उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने कोरोनाच्या काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्यात चौकशीसाठी बोलावले आहे. अमोल कीर्तिकर हे मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहे. काही दिवसांवर लोकसभा निवडणुका होणार असताना या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटाने त्यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील दिली आहे.

उमेदवारीची घोषणा होताच ईडीचे समन्स

अमोल कीर्तिकर यांना ईडीने 27 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने त्यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याची घोषणा होण्याच्या काही तासांतच त्यांना तपास यंत्रणेकडून फोन आला. या मुळेच उद्धव ठाकरे गटाने केंद्र सरकारवर निशाणा साधताना तपास यंत्रणांच्या गैरवापर होत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे. अमोल हे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. गजानन कीर्तिकर हे मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांना उमदेवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

खिचडी घोटाळ्याचा आरोप
कथित खिचडी घोटाळा हा कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटपाच्या करारातील अनियमिततेशी निगडीत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असता, बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत 6 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. खिचडीचे कंत्राट फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कीर्तिकरची यापूर्वीच चौकशी केली आहे.

‘मी घाबरलेलो नाही’ – अमोल कीर्तिकर

मागील वेळी मला बाहेर जायचे होते, त्यामुळे चौकशीसाठी जाऊ शकलो नाही. मात्र, मी घाबरलेलो नाही. मी आवश्यक ती तयारी केली असल्याचेही अमोल कीर्तिकर यांनी म्हटले आहे. हा तपास संत्रणांचा गैरवापर असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, लोकसशाहीतील तिसऱ्या स्तंभाच्या माध्यमातून जनता सर्व पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0