Amit Thackeray On Uddhav Thackeray : “बिनशर्ट” पाठिंबा.. अमित ठाकरे कडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर..
•Amit Thackeray On Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी वर्धापनादिनी मनसेच्या बिशर्त पाठिंबाच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले, मनसे कडून आक्रमक पवित्रा, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 58 व्या वर्धापनदिनी षण्मुखानंद सभागृहात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लागवत राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंबाची खिल्ली उडवत उद्धव ठाकरे यांनी “बिनशर्ट”पाठिंबा या वक्तव्यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे असलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. वरलीत पाठिंबा घेऊन मुलाला आमदार केले तेव्हा त्यांना काही वाटले नाही का असा सवाल अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
अमित ठाकरे बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या विधानावर अमित ठाकरे चांगलेच आक्रमक होताना दिसले. उद्धव ठाकरे यांचा विनोद कळायला दहा मिनिटे लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काय वाटले नाही का. तेव्हा त्यांनीच घेतला ना आणि मुलाला आमदार केलं ना पण या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरेंनी जो पक्ष काढलाय तो स्वतःच्या मेहनतीवर काढलाय पक्ष मोठा व्हायला वेळ लागते असे असले तरी तो मेहनतीने काढलेला पक्ष असा टोलाही आम्ही ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लावला आहे.
उद्धव ठाकरेंची टीका, मनसे नेत्यांचेही प्रत्युत्तर दरम्यान, काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला. तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर मनसे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तर दिले होते. कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत ? असे राजू पाटील म्हणाले. तर हिरव्या मतांच्या जोरावर विजय मिळवल्यामुळे काही जण पांचट जोक मारत आहेत असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला होता.