Amit Thackeray On Maharashtra Sarkar : ‘तो कपडा पुन्हा काढून फेकू’, अमित ठाकरेंचा थेट इशारा; बदनामी सहन न झाल्याने पालिकेने पुन्हा पुतळा बंदीस्त केल्याचा मनसेचा आरोप
नवी मुंबई (नेरूळ) :- नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) नेरूळ येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा कापडाने झाकून बंदीस्त केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सहा महिन्यांपासून अनावरण न करता घाणेरड्या कपड्याने झाकलेला हा पुतळा मनसे नेते अमित ठाकरे Amit Thackeray यांनी रविवारी (16 नोव्हेंबर) अचानक अनावरण करून खुला केला होता. या प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनसेचा ‘मोगलाई’चा आरोप
पुतळा पुन्हा झाकल्यामुळे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत म्हटले की, “महानगरपालिकेने छत्रपतींना बंदीस्त करून हे मोगलाई सरकार असल्याचे सिद्ध केले आहे.” तसेच, मनसेने आता ‘गनिमी काव्याचे अनावरण’ करू, असा थेट इशाराही दिला आहे.
अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
गुन्हा दाखल झाल्यानंतरही अमित ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी पुन्हा पुतळा झाकल्याबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले:
माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली केस ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे…
याचा मला अभिमान आहे!!!
काल माझ्या सहकाऱ्यांसह विधिवत आरती करून महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले गेले. पण महाराजांच्या पुतळ्यासह सभोवतालच्या मंडपाला आज पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आलं आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…