•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्र्यांचे सपत्नीक दर्शन
मुंबई :- मुंबईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. सोनल शाह उपस्थित होत्या. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण भेट गणेशोत्सवाच्या निमित्ताने झाली.यावेळी अमित शाह यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी स्थापन केलेल्या गणपतीची मनोभावे पूजा आणि आरती केली.
त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांनीही बाप्पाचे दर्शन घेतले.
या भेटीत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हेदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेली एकजूट पुन्हा एकदा दिसून आली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…