मुंबई

Amit Shah & Eknath Shinde : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील लालबागच्या राजाला भेट दिली.

•Amit Shah & Eknath Shinde Visited Lalbaghcha Raja केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांनी मुंबईतील लालबागचा राजाची पूजा केली.

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी मुंबईतील लालबागचा राजा येथे गणपतीची पूजा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या वेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ते आपल्या पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले.

अमित शहा यांनी लालबागचा दर्शनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षाच्या शासकीय निवासस्थाने जाऊन गणरायांचे पूजा केली. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर आरती घेण्यात आली होती. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदे कुटुंब उपस्थित होते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार आशिष शेलार यांच्या सह भाजपाचे प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0