क्राईम न्यूज

अंबरनाथ : तीन जिवंत काडतुसे, गावठी कट्ट्यासह युवक पोलिसांच्या जाळ्यात

Ambernath Police Seized Gun From Criminal : अंबरनाथ पोलिसांनी बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला जेरबंद

अंबरनाथ :- अंबरनाथ येथील डीएमसी कॉर्नर बंद कंपनी मागील रोडवर एक तरुण एक गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे Ambernath Police Station तपास पथकातील पोलीस हवालदार संजय चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कजारी यांना मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका 19 वर्षीय युवकाला बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार संजय चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, डीएमसी कॉर्नर बंद कंपनी मागील रोडवर एक व्यक्ती बंदूक घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तपास पथकाचे टीम तयार करून बातमीच्या आधारे बंद डीएमसी कंपनी मागील रोडवर सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्टल (गावठी कट्टा) आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आलं आहे. प्रथमेश उर्फ लकी सुधाकर लोंढे (19 वय रा. भीम नगर कानासई रोड, अंबरनाथ पूर्व) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) ,135 प्रमाणे अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे.

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त सचिन गोरे , सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी, पोलीस हवालदार संजय चव्हाण ,जाधव, पोलीस नाईक हेमंत पाटील, पोलीस शिपाई मुरलीधर गवळी ,मंगेश सूर्यवंशी यांनी केलेली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago