Ambernath Robbery Case : अंबरनाथमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; चॉपर, लोखंडी हत्यारे जप्त
Ambernath Shivaji Nagar Police Arrested Robbers With Weapon : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हेगार मोटरसायकलवर संशयित पणे सुदामा हॉटेल जवळ आनंद नगर जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
अंबरनाथ :- शिवाजीनगर पोलिसांनी Shivaji Nagar Police दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील दोन जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून चॉपर, सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे. पहाटेच्या दरम्यान हे दोघेजण अंबरनाथच्या सुदामा हॉटेल जवळ आनंद नगर होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन संशयित रित्या फिरत असल्याचे पोलिसांना Ambernath Police माहिती मिळाली होती. Ambernath Robbery Case
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके आणि पोलीस हवालदार हांडे यांच्या पथकाने सुदामा हॉटेल जवळ आनंद नगर पोलीस चौकीकडे जाणाऱ्या रोडवर अंबरनाथ पूर्व येथे सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे समजले. आरोपीकडुन होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल, एक लोखंडी कटावणी, चॉपर, स्कु, हातोडी, लोखंडी पकड, एक सुती पांढरी दोरी, एक कात्रीचे पात, एक छोटी बॅटरी, दोन लाल मिरचीच्या पेंकिग पुड्या बॅग, हिरो कंपनीचा मोबाईल फोन असे प्राणघातक हत्यारे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुध्द गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5) गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. तीन फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके हे करीत आहेत. Ambernath Robbery Case
अटक आरोपींची नावे
1.रोहित राजेश सिंग, (20 वय)
2.किरपाल बबलू सिंग, (19 वय) दोघे रा. गांधीनगर, गुरूद्वाराचे पाठीमागे स्वामीनगर जुन्या रेल्वे पटरीजवळ, अंबरनाथ पश्चिम.