Ambernath MIDC Robbery : अंबरनाथ एमआयडीसी कंपनीमध्ये चोरी
Ambernath MIDC Robbery News : अंबरनाथ पूर्व येथे एमआयडीसी मधील गारमेंट कंपनीमध्ये चोरी, 15 लाखांचे सामान चोरीला
अंबरनाथ :– एमआयडीसी आकाश इंपेक्स गारमेंट कंपनी Ambernath MIDC यामध्ये मोठी चोरी झाली आहे. जवळपास 15 लाखांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. गारमेंट मशीन सह कम्प्युटरही चोरट्यांनी पळवला आहे. अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police तक्रार दाखल करण्यात आली आहे. Ambernath Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान अंबरनाथ पूर्व येथे असलेल्या एमआयडीसी परिसरातील आकाश इन्फेक्स गारमेंट कंपनीमध्ये चोरी झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. कंपनीच्या सिक्युरिटी गार्ड गंगाराम बरमदीन त्रिपाठी (56 वर्ष,रा. कुर्ला पश्चिम मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंपनीमध्ये चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कंपनीच्या दरवाज्याचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून त्या वाटे आत प्रवेश करून आतील एमरॉयडरी मशीद पार्ट, लोखंडी खिडक्या दरवाजे, कंप्यूटर, लोखंडी कपाट इतर सामान असा एकूण पंधरा लाख किंमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 305(ए),331(3), 331(4),324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी हे करत आहे. Ambernath Latest Crime News