Ambernath Police Latest Crime News : जीएसटी अधिकारी दारात धडकल्यावर तरुणांच्या पायाखालची जमीन सरकली; अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ | नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा वापर करून तब्बल 42 कोटी 99 लाख 31 हजार रुपयांची अवैध उलाढाल केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. दोन भामट्यांनी मिळून पाच सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवला. जेव्हा जीएसटी अधिकारी एका तरुणाच्या घरी चौकशीसाठी पोहोचले, तेव्हा या महाघोटाळ्याचे बिंग फुटले.
असा फसला अमर जैसवार आणि त्याचे मित्र महात्मा फुले नगरमध्ये राहणारा अमर जैसवार हा तरुण गेल्या वर्षी जुलै महिन्यात नोकरीच्या शोधात होता. त्याचा मित्र विशाल यादव याने त्याची ओळख सलमा सय्यद नावाच्या महिलेशी करून दिली. सलमाने नोकरीचे आमिष दाखवून अमरसह आदिल सैय्यद, विशाल जैसवार, रजनीश गौतम, दीपक करोतिया आणि रितेश यादव या पाच जणांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक व्यवहाराची कागदपत्रे घेतली. नोकरीची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगून त्यांच्याकडून बँकेचे ओटीपी (OTP) देखील मिळवले.
जीएसटी अधिकाऱ्यांच्या भेटीने फुटले बिंग नोव्हेंबर 2025 मध्ये वांद्रे येथील जीएसटी विभागाचे अधिकारी अचानक अमरच्या घरी पोहोचले. “तुम्ही कंपनी स्थापन करून संशयास्पद व्यवहार केले आहेत, त्याचा हिशोब द्या,” असे अधिकाऱ्यांनी सांगताच अमरला धक्का बसला. त्याने अशी कोणतीही कंपनी उघडली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर झालेल्या चौकशीत समोर आले की, सलमा सय्यद हिने अमरच्या नावे ‘जलज्योती एन्टरप्रायझेस’ आणि इतर तरुणांच्या नावे अशाच बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या.
43 कोटींची परस्पर उलाढाल या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून भामट्यांनी 42 कोटी 99 लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार केले होते. तरुणांना अंधारात ठेवून त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा वापर आर्थिक गुन्हेगारीसाठी करण्यात आला. आपली आणि शासनाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमर जैसवार याने अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी सलमा सय्यद आणि विशाल यादव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…