•पत्नीची पतीकडून हत्या अंबरनाथ मध्ये धक्कादायक प्रकार समोर, फरार पतीला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी केले अटक
अंबरनाथ :- कौटुंबिक वाद जीवावर उठले निमित्त होतं मुलीचा संभाळ अंबरनाथ मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर फरार पतीला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आपल्या एक वर्षाच्या मुलीला चांगल्या प्रकारे पत्नीला सांभाळता येत नाही. हाच राग मनात धरून संतप्त पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत ही घटना घडली. विकी बबन लोंढे (27 वय) असे आरोपीचे नाव असून मृत पत्नीचे नाव रूपाली विकी लोंढे (26 वय) असे आहे. हे दाम्पत्य आपल्या एक वर्षाच्या मुलीसह येथे वास्तव्याला होते. रूपालीला मुलीचा सांभाळ नीट करता येत नसल्याने विकीचे तिच्यासोबत नेहमी वाद होत होता.या कारणावरूनच 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात विकीने रूपालीचा पट्ट्याने गळा आवळला आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरला. या हल्ल्यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या करून विकी हा उत्तर प्रदेशात पळून गेला. पोलिसांनी त्याचा माग काढत हत्येच्या 8 दिवसानंतर त्याच्या वाराणशीतून मुसक्या आवळल्या. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तिथे स्थानिकांच्या वेशभूषेत सापळा रचून त्याला पकडले. अटक पतीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पु.प्रा.वि. कल्याण, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर, सुरेश वराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तुकाराम पादीर, पोलीस उपनिरीक्षक एस.एस. शेख, पोलीस हवालदार सैंदाणे, पातीर, वळवी, चौधरी, खामकर, पोलीस नाईक साळुंके, भोसले, देवरे, पोलीस शिपाई राजगे, गायकर,मुठे, वाघमारे, काकडे, चत्तर,बोडके,गायकवाड यांनी पार पाडुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…