Ambernath Crime News : ऑनलाइन फसवणूक ; पार्ट टाइम नोकरीच्या नावाखाली लाखोचा गंडा

•बिटकॉइन स्वरूपात टॉक्स केल्यास चांगले कमिशन देण्याचे अमिष देऊन आर्थिक फसवणूक
अंबरनाथ :- पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक झाल्याची घटना अंबरनाथ मध्ये समोर आली आहे. बिटकॉइन स्वरूपात टॉस्क केल्यास चांगले कमिशनची आमिष देऊन सहा लाखांहून अधिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादी महिला, (26 वर्षे) (रा.अंबरनाथ पश्चिम) यांना तीन अनोळखी महिलांनी टेलीग्रामच्या माध्यमातुन संपर्क करून पार्टटाईम नोकरी देत असल्याचे सांगुन तसेच बिटकॉईन स्वरूपाचा टॉस्क केल्यास चांगले कमिशन देण्याचे अमिष दाखवून त्यांना एकुण 6 लाख 89 हजार 440 रूपये रक्कम ऑनलाईन आरोपीतांच्या बॅक खात्यावर पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात महिला आरोपींविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे हे करीत आहेत.