Ambernath Crime News : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का केला या कारणावरून जीवघेणा हल्ला
•Ambernath Crime News अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला, आरोपीने स्टीलच्या रोडने डोक्यात हल्ला
अंबरनाथ :- सागर जाधव आणि राहुल जाधव हे अंबरनाथ पश्चिम मध्ये राहणाऱ्या युवकांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सागर जाधव यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली या कारणावरून आरोपी राहुल जाधव यांनी लोखंडे रॉडने सागर जाधव याच्या डोक्यात हल्ला केला होता. Ambernath Crime News
शिवसेना शाखा भास्कर नगर अंबरनाथ पश्चिम येथे राहणाऱ्या सागर जाधव (25 वर्ष) आणि राहुल जाधव (34 वर्ष) यांच्या दुवा झाला 15 मे ला सागर में राहुलच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून राहुलने सागरच्या डोक्यात स्टीलच्या रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर जखमी सागर याच्यावर उल्हासनगर-03 येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार चालू आहे. घडलेल्या घटनेबाबत सागराच्या पत्नीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.द.वि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे तसेच पुढील कारवाई पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहे. Ambernath Crime News