Ambernath Crime News : पैशाच्या व्यवहारातून वाद ; प्राणघातक हल्ला
•अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार, आरोपी सहित 15 ते 20 जणांनी फिर्यादी याच्यावर प्राणघातक हल्ला
अंबरनाथ :- पैशाच्या व्यवहारातून व्यक्तीवर दोन आरोपी सहित 15 ते 20 जणांनी प्राणघात हल्ला केला आहे. सोमवारी (11 मार्च) रात्री 1.30 वाजेच्या सुमारास ओटी सेक्शन वडोलगाव उल्हासनगर तीन येथे फिर्यादी शंकर विठ्ठल जाधव (50 वर्ष) यांचे रोहित राजेश गायकवाड (27 वर्ष) आणि परशुराम सदाशिव संपाद (26 वर्ष) यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता. वादाचे रूपांतर भांडणात झाले या भांडणात गृहीत गायकवाड आणि परशुराम संपाल यांनी आपल्या पंधरा ते वीस साथीदारांच्या मदतीने व्यवहाराचा राग मनात धरून फिर्यादी यांना कोयत्याने वार केले आहे. या घटनेनंतर वडोलगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Ambernath Crime News :
फिर्यादी शंकर यांच्या वर झालेल्या कोयत्याच्या वारणे शंकर हे गंभीर जखमी झाले त्यांना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असून, अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली असून आरोपीच्या विरोधात भादवी कलम 307,143,147, 149,323,427,504,506 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी क्र. 1 व 2 यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहेत. Ambernath Crime News :