Ambernath Crime News : तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी तरीही बेकायदेशीर वाहतूक, 22 वर्षीय तरुणाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
•महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीरपणे वाहतुक प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
अंबरनाथ :- राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीरपणे वाहतुक प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ऐजाज रिजाज शेख (22 वय) अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पाच लाख 32 हजार चारशे चार रुपये किंमतीचा विमल पान मसाला आणि वि-1 तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार के बी रोड, डी मार्ट समोर अंबरनाथ पश्चिम येथे एक व्यक्ती ज्याच्याकडे तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करून विक्रीसाठी नेणाऱ्या गुटखाजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऐजाज रिजाज शेख (रा. बदलापूर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 5 लाख 32 हजार 404 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123,274,275,223 सह अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26(2),(i),26(2) (iv), 27(3)(d), 27(3) (e), 30(2) (जे), 59(i) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे हे करीत आहे.