अंबरनाथ निबंधक सहकारी संस्था विभागातील सहाय्यक अधिकारी चेतन आत्माराम चौधरी आणि कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील (44 वय) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 60 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे
अंबरनाथ :- अंबरनाथ सहकारी संस्था विभागातील सहाय्यक निबंधक अधिकारी चेतन चौधरी आणि कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील (44 वय) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 60 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. इमारतीला गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी कनिष्ठ लिपिक चेतन पाटील यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची माहिती पथकाने दिली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांनी 3 जानेवारी 24 रोजी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार याचेकडे कनिष्ठ लिपिक पाटील यानी स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करणेसाठी 70 हजार रुपयाची लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने 3 जानेवारी 25 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान विजयसिंग अजबसिंग पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करणेसाठी तडजोडीअंती 60 हजार रु. लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून लोकसेवक चेतन पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन मागणी केलेली लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष 60 हजार तक्रारदार यांचेकडुन स्विकारली. तसेच रक्कम स्विकारण्याकरीता लोकसेवक चेतन पाटील, सहायक निबंधक यांनी प्रोत्साहन दिले आहे.यावेळी लोकसेवक पाटील यांनी लाचेची रक्कम स्विकारल्याने सापळा पथकाने लोकसेवक विजयसिंह पाटील यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. लाचेची रक्कम लोकसेवक यांचेकडून हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक माधवी राजकुभांर यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.