मुंबई

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहाटेचा शपथविधी फोटो टाकत, शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांना डिवचले!

Ambadas Danve : विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहाटेचा शपथविधीचा फोटो शेअर करत विरोधकांना डिवचले

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा फोटो ट्विट करत सत्ताधारी महायुतीला डिवचले आहे. राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत एक आठवण करून दिली त्यामध्ये ते म्हणाले 23 नोव्हेंबर 2019 पहाटेची शपथ आणि 23 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीचा निकाल लावणार आहे.

अंबादास दानवे काय ट्विट केले ?

हा फोटो आठवतोय ना?

या पहाटेच्या शपथविधीची तारीख होती २३ नोव्हेंबर २०१९. आता २३ नोव्हेंबर २०२४ रोजीच महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी यांचा निकाल लावणार आहे!

काळे जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेले या फोटोतील नेते आता गेले दोन वर्षांतील घटनाबाह्य सरकारच्या काळातील जंत्री आपल्यापुढे वाचतील. मात्र यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला हा पहाटेचा शपथविधी फक्त लक्षात ठेवावा.. बाकी विजय आपलाच आहे!

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts