मुंबई

Ambadas Danve : “घाव भरावा, शिवसेना एकत्र यावी!” – अंबादास दानवे यांचे भावनिक आवाहन

•राज-उद्धव मंचावर एकत्र; शिंदे-उद्धव गट एकत्र येणार? चर्चा रंगली

मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या एकीकडे महायुतीतील गोंधळ तर दुसरीकडे शिवसेनेतील फुटीच्या जखमा पुन्हा उफाळून येत आहेत. 2022 मधील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची दोन फळी निर्माण झाली. पण आता शिंदे आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सत्कार समारंभात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर होते. मात्र, दोघांमध्ये साधा नजरेचा संपर्कही झाला नाही. तरीही, शिवसेनेच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अंबादास दानवे यांनी पक्षातील फुटीवर भाष्य करत ती “शिवसेनेच्या हृदयात खोलवर झालेली जखम” असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही सत्तेसाठी पैदा झालेलो नाही. सत्ता तर येते आणि जाते. पण संघटनेची एकजूट हीच खऱ्या शिवसेनेची ताकद आहे.” त्यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत, “ही जखम आता भरून निघायला हवी,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.दानवे म्हणाले – “शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तो एक संस्कार आहे. एक शिवसैनिक म्हणून मला हे दुःख सहन होत नाही. शिवसेनेने पुन्हा बळकट व्हावं, हेच माझं स्वप्न आहे.”

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 39 आमदारांनी बंड करून वेगळा गट स्थापन केला आणि भाजपा सोबत सरकार स्थापन केले. यानंतर अजित पवार गटाचेही सरकारात आगमन झाले. हे सगळं घडलं असलं तरी अनेक शिवसैनिकांच्या मनात ती फूट अजूनही कुरतडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0