Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात

•एस टी भाडेवाढीच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक, उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनापूर्वी छत्रपती संभाजी नगर मध्ये आजच चक्काजाम आंदोलन, आंदोलक अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर :-एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बसच्या तिकिटामध्ये 14.95% भाडेवाढ करण्याच्या प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून संतापाची लाट उसळली होती. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने एसटी महामंडळाच्या तिकिटामध्ये वाळ केली. या भाडेवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने साडेअकराच्या वाजता सुमारास राज्यभरातील प्रमुख एसटी महामंडळाच्या डेपो जवळ चक्काजाम आंदोलन करणार आहे. परंतु त्यापूर्वीच राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात चक्काजाम यांच्या वतीने करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना तसेच अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले आहे.


एस टी महामंडळाने तिकिटाच्या दरात 14.97 टक्के एवढे भाव वाढ केले. या भाववाढीमुळे महाराष्ट्रातील जनता आधीच महागाईने त्रस्त झाली असता एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे जनतेला आणखी आर्थिक बोजा सहज करावा लागेल त्यामुळेच या भाववाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाने आपल्या प्रस्तावात 14.95 टक्के भाडेवाड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तर ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी दरवाढ करण्याची मागणी केली होती. या दरवाढीमुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होऊ शकते. टॅक्सी व ऑटोसाठी शेवटची भाडेवाड ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती आदी कारणांमुळे ही ही भाडेवाड करणे गरजचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजूरी दिली आहे.
एस टी महामंडळाच्या वतीने एसटी बसच्या तिकिट दरामध्ये करण्यात आलेल्या दरवाढीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. या संदर्भात त्यांना प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी भाडेवाडीचा निर्णय परस्पर घेतला असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे एसटी भाडेवाढ लागू झाली तरी परिवहन मंत्र्यांना त्याची साधी कल्पनाही नव्हती का? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात ही दरवाढ लागू झाली आहे.