मुंबई

Ambadas Danve : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धुवत असतानाचा फोटो ट्विट ; अंबादास दानवे

Ambadas Danve : महाराष्ट्राचे गृहमंत्री एवढे निष्क्रिय आहे की,सत्ताधारी आमदारांच्या गाडी पण पोलिसांनी धुण्याची वेळ आली आहे का? विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

मुंबई :- विधानसभेच्या निवडणुका जसजसे‌जवळ येत आहे.तसतसे विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. सत्ताधाऱ्यांच्या सर्व बारीक हालचालींवर विरोधक लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. बदलापूर बलात्कार प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना महाराष्ट्र पोलिसांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे. अंबादास दानवे यांच्या फोटोच्या ट्विट मुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चाला वाचा फोडली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक सप्टेंबरला राज्यभरात सरकार विरुद्ध जोडेमारो आंदोलन करणार आहे. यापूर्वीच मागील शनिवारी महाविकास आघाडीने राज्यभरात बदलापूर बलात्कार प्रकरणा विरुद्ध काळेफितीपासून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला होता. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय आरोप प्रत्यारोपाची मालिका चालू झाली आहे.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे ट्विट

महाराष्ट्राते गृहमंत्री येवढे निष्क्रिय की, आत्ता पोलिसांना सत्ताधारी आमदारांची गाडीपण धुऊन द्यायची वेळ आली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना महाराष्ट्र पोलिस.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago