मुंबई

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रत्युत्तर, मोहोळ फक्त टोल नाक्यावर दगड…

•शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांचा घेतला समाचार

मुंबई :- मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण सुरु आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. तर माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेला मनोज जरांगेंच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. राज ठाकरेंनी ते प्रुफ करावं, परंतु त्यांचे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं. हे मोहोळ सुपाऱ्या वाजवण्यासाठी असतं, हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे, असे खोचक शब्दात अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

अंबादास दानवे म्हणाले की, मनोज जरांगेंच्या आडून आमचं राजकारण सुरु आहे, हे राज ठाकरेंनी प्रुफ करावे. असं कुठं असायचं काहीच कारण नाही. हे धंदे शिवसेना तर कदापी करणार नाही. अजित पवारांनी जातीचं राजकारण केलं नाही, हा साक्षात्कार यांना आत्ता झाला. तुमच्या मागील काळातील भूमिका पाहिल्या तर मला वाटतं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. आम्ही फार काही सांगावे अशातील मुळीच भाग नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0