महाराष्ट्र

Ambadas Danve : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी दामिनी पोलीस पथकातील भगिनींसोबत साजरी केला रक्षाबंधन

Ambadas Danve news : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलिसांसोबत साजरी केले रक्षाबंधन

छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयाच्या दामिनी पथकातील Damini Squad महिला पोलीस भगिनींसोबत Sambhaji Nagar Police रक्षाबंधन साजरी केली आहे. दामिनी पथकातील महिला पोलीसवर्ग मोठ्या प्रमाणावर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राखी बांधण्याकरिता उपस्थित होते. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त दिलीप पवार पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी आणि पोलीस निरीक्षक गीता बागोडे उपस्थित होते.

अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले की,संभाजीनगरातील पोलीस विभागातील दामिनी पथकातील भगिनींसोबत आज रक्षाबंधनाचा मंगलमय सण साजरा केला. माता भगिनींच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या या महिला भगिनी कर्मचाऱ्यांसोबत राखी पौर्णिमेचा पवित्र सण साजरा करून त्यांच्या सत्कार्याचा सन्मान केला.

आपल्या सक्षम कारभारामुळे दामिनी पथकातील महिला भगिनींनी माता भगिनींच्या रक्षणासाठी शहरात सक्षम व्यवस्था उभी केली आहे. एक भाऊ म्हणून राखी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भाऊंच्या भूमिकेत असणाऱ्या या भगिनींच्या हस्ते राखी बांधुन त्यांच्या कर्तव्याचा आदर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0