Ambadas Danve : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
Ambadas Danve On Devendra Fadnavis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला कठोर कारवाई करण्याचे दिले निर्देश
वसई :- दिवसाढवळ्या तरुणीची भर रस्त्यात एका तरुणाने गाडीच्या लोखंडी पान्याने हत्या करण्यात आली होती. सकाळी आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भर रस्त्यात लोकांच्या मध्ये प्रियकरांनी आपल्या एक्स प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेनंतर आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचा राजीनामा मागितला आहे. तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्ना निर्माण होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मुलीची हत्या होत असताना त्या मुलीला कुणी मदत केली नाही. महाराष्ट्राच्या राजधानीलगत इतकी गंभीर घटना घडणं हे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारं आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
अंबादास दानवे यांच्याकडून राजीनामाची मागणी..
भर दिवसा एका तरुणीचा प्रियकराकडून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज वसईत घडली. या घटनेवरून राज्यात मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे. त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश
वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे. Vasai Murder News
वसईत नेमकं काय घडले?
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (29) आणि आरती यादव (22) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलांशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं झाली आहे. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. Vasai Murder News