Ambadas Danve : ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ चा अंक दुसरा! विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची पोस्ट व्हायरल
राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती बिल्डरच्या घशात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
मुंबई :- राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पर्यटक दिवशी पर्यटनमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला अत्यल्प दरात भूखंड देण्याचे प्रकरण अजूनही ताजे आहे. असे असतानाच आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर दुसरा गंभीर आरोप केला आहे. राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि मोकळ्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातील यादीच त्यांनी जाहीर केली आहे.
या संदर्भात अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. या खासगीकरणामुळे एकूण 200 मराठी अधिकारी कर्मचारी यांच्या नोकऱ्या शासन खाणार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. जागतिक पर्यटन दिनीच भूखंड माफियांना सरकारने देऊ केलेले हे दिवाळीचे फटाके असल्याचा आरोप देखील दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
अंबादास दानवे यांची पोस्ट
‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ चा अंक दुसरा!
बावनकुळे भूखंड प्रकरण ताजे असतानाच आता राज्यातील तब्बल ३० एमटीडीसी रिसॉर्टच्या इमारती मोकळ्या जमिनींसह बिल्डरांच्या/भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव आज जागतिक पर्यटन दिनी राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने मांडला आहे. याने हे रिसॉर्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातीलच, पण..
1.या खासगीकरणाने पहिल्याच टप्प्यात 46 अधिकारी कर्मचारी (11 ऑक्टोबर 2024 पासून) आणि 200 इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी मराठी मुला-मुलींची नोकरी खाल्ली आहे.
2.एवढ्यावर ही लूट थांबत नाही तर या खासगी उद्योजकांना 20 टक्के कॅपिटल सबसिडी, 5 ते 15 वर्षे जीएसटी परतावा, स्टॅम्प ड्युटीवर बंपर सूट, कर्ज घेण्यास हमी ही खैरात करण्यात आली आहे.
3.1994 साली चिकलदरा येथील रिसॉर्टसाठी कर्जासही एमटीडीसीने हमी दिली. परतफेड न केल्याने येथील रिसॉर्ट खासगी मालकाच्या घशात गेले असताना हा स्वस्तात जमिनी लाटण्याचा प्रकार सरकारने चालवला आहे.
जागतिक पर्यटन दिनी भूखंड माफियांना सरकारने घेऊन दिलेले दिवाळीचे हे फटाके आहेत. उडवा आणि विसरून जा.. प्रॉफिटधील प्रचंड मोठ्या शासकीय मालमत्ता कोणाच्या घशात घालायच्या आहेत, याचे उत्तर पर्यटनात शून्य इंटरेस्ट असलेले पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर द्यायला हवे!
(या घोटाळ्यात गोवलेल्या ३० एमटीडीसी रिसॉर्ट्सची यादी देतो आहे. नोकरी जाणाऱ्यांची यादी आहे. ती मुद्दाम इथे पोस्ट केलेली नाही.)