मुंबई

Ambadas Danve : मी पुन्हा येईन” – अंबादास दानवे यांच्या निरोपावेळी सभागृहात भावनिक क्षण!

Ambadas Danve Latest News : “ज्यांनी उमेदवारीला विरोध केला, तेच आता कौतुक करतायत” – ठाकरे यांचा निशाणा

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी आज विधान परिषदेत भावनिक आणि सत्ताविरोधी सूर मिसळलेला अनोखा क्षण पाहायला मिळाला. विरोधक असो वा सत्ताधारी, सर्वच सदस्यांनी त्यांच्या राजकीय कामगिरीला सलाम करत कौतुकाची थाप दिली.29 ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपत असून, त्याआधीचा आजचा (17 जुलै) दिवस सभागृहात एकप्रकारे त्यांच्या निरोप समारंभासारखा ठरला.

एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं नेतृत्व

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अंबादास दानवे यांचे खुलेपणाने कौतुक करत, त्यांच्या मुद्देसूद मांडणीबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, “दानवे हे विरोधी पक्षात असूनही राजकीय सभ्यता पाळणारे नेते आहेत.”

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती – ‘माझ्याकडून त्यांनी घेतले, मी त्यांच्याकडून घेतलं’

विधान परिषदेचे सदस्य आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भूतकाळातील राजकीय संदर्भ उपस्थित करत सरकारवर उपरोधिक टीका केली. “माझ्याकडून त्यांनी काही लोक घेतले, पण त्यांनी मला एक चांगला कार्यकर्ता दिला – अंबादास दानवे,” असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अप्रत्यक्षपणे आभार मानले.

ठाकरे पुढे म्हणाले,“आज अंबादास दानवे यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांनी जोरात ‘मी पुन्हा येईन’ असं बोलायला हवं होतं… आणि त्याच पक्षातून येईन असंही!”“ज्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, तेच आज कौतुक करत आहेत हे पाहून समाधान वाटतं.”

अंबादास दानवे यांनी नुकतेच केलेल्या आंदोलनाचाही उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “दानवे यांचा मला अभिमान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही त्यांच्या या कारकिर्दीचा अभिमान वाटला असता.” त्यांनी शिक्षणापेक्षा शिकलेलं आणि त्याचा समाजासाठी उपयोग किती, हेच अधिक महत्त्वाचं असल्याचंही अधोरेखित केलं.

vivek

Recent Posts