मुंबई

Ambadas Danve : “जय भवानी… जय शिवाजी…”, नारा देत मत मिळवण्याचे दिवस गेले ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

Ambadas Danve Statement : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या विधानामुळे सध्या चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे

पनवेल :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक अजब विधान केले आहे. दानवे म्हणाले की आता राज्यात जय भवानी जय शिवाजी नारा देत मत मिळवण्याचे दिवस गेलेले आहे. अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आली आहे. अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट नक्कीच बदललाय का? उद्धव ठाकरे यांचे शिवसेना खरेच बदलले आहे का? असा प्रश्न यावेळी राजकीय पटलावर उपस्थित होत आहे.

शिवसेनेकडून रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे शिवसेना ठाकरे गटाचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना अंबादास दानवे यांनी राजकारणाची सध्या बदललेले परिभाषा समजावून सांगत असताना खरी ओळख असणाऱ्या जय भवानी जय शिवाजी या नाऱ्या शिवाय उपरोक्त विधान केले आहे. सध्या राजकारणाचे परिभाषा बदलल्याने त्यामुळे केवळ जय शिवाजी जय भवानी मनात मते मिळवण्याची दिवस गेले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटावर लांगुलचालन केले जात असल्याचा आरोप करताना दानवे यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयती संधी मिळाली आहे.

दुसरीकडे, ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीतील हाराकिरी बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपासूनच मुंबईतील आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना नव्या जोमाने मुंबई महापालिकेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. याशिवाय त्यांनी राज्यभरात या निवडणुका स्वबळावर लढण्याचेही संकेत दिलेत. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागल्याचा दावा केला जात आहे. सुप्रीम कोर्टातील 25 फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0