Ambadas Danve : डॉ. पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीवरून विरोधकांना आयते कोलीत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे गंभीर आरोप
•डॉ पल्लवी सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधे,यंत्रसामुग्री सही करत नाही…. दानवे यांचा गंभीर आरोप
मुंबई :- पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील एसआयटी समिती स्थापन केली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षपदी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या नियुक्तीवर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत डॉ. सापळे या औषधी, यंत्रसामग्री देण्याकरिता कमिशन देत असतात असा आरोप दानवे यांनी केला आहे.
चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत?; अंबादास दानवे
सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे दिले. मुळात डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता. यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतू वर शंका आणणारे आहे? ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही.. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी.उलट सापळे यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले, हे सरकारने सांगावे. हे असले अधिकारी नेमून हेच सिद्ध होते की पुणे प्रकरणी सरकार अजूनही गंभीर नाही. असे अधिकारी नेमले असतील तर तपासा अंती काय समोर येईल, हे कोणीही आत्ताच सांगू शकेल.. त्याला चौकशीच्या ड्रामा करण्याची गरज नाही.मुळात ससूनचे डॉक्टर, त्यांनी इमान विकून केलेला कारभार याचा आमदार सुनील टिंगरे यांच्याशी काही संबंध आहे का, हे देखील तपासले गेले पाहिजे. हे आमदार अपघात झाल्यावर का पोलिस ठाण्यात जाऊन बसले होते, याचे उत्तर अजून त्यांनी दिलेले नाही! म्हणून चौकशीची व्याप्ती वाढली पाहिजे.
डॉ. पल्लवी सापळे काय आरोप होते?
डॉ. पल्लवी सापळे या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठाता (Dean) आहेत. जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत. डॉ. पल्लवी सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा मुद्दा विधानसभेत सुद्धा चर्चेत आला होता.