मुंबई

Ambadas Danve : ठेकेदार जात्यात आहेत, सरकारी कर्मचारी सुपात… विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यातील कंत्राटदारी थकल्यामुळे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

मुंबई :- राज्याचे विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी राज्यातील कंत्राटदारांची बिले थकल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात सरकारवर निशाणा साधला. या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून दानवे यांनी सरकारवर टीका केली. आज ठेकेदार जात्यात आहेत, तर सरकारी कर्मचारी सुपात आहे. मात्र, अगदी नजीकच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे या सरकारकडे राहणार नसल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालाय!
इलेक्शन जुमल्यांवर पैसे खर्च करत सुटलेल्या महाराष्ट्र सरकारचे आता तोंड झाकले तर पाय उघडे पडतायेत. झालेल्या कामांची चाळीस हजार कोटींची ठेकेदारांची देयके राज्यातील महायुती सरकारने थकवली आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जल जीवन मिशन, जलसंवर्धन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पालिका, नगरपरिषदा आदी महत्वाच्या विभागांमधील बिलांचा यात समावेश आहे. लक्षात ठेवा, आज ठेकेदार जात्यात आहेत, तर सरकारी कर्मचारी सुपात. अगदी नजीकच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे या सरकारकडे राहणार नाहीत, कारण या सरकारने महाराष्ट्र दिवाळखोरीत काढला आहे!

कुठे गेली ती आर्थिक शिस्त ? ; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार!

राज्यातील कंत्राटदारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महायुती सरकारच्या आर्थिक बेशिस्त कारभारामुळे राज्यातील कंत्राटदारांची तब्बल 40 हजार कोटींची बिल थकली आहेत.

कंत्राटदार आणि आणि अभियंता संघटनांनी पाच वेळा आठवण करून देऊनही या सरकारने बिल चुकती केली नाही. स्वतःच्या प्रचारासाठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू आहे, पण काम करणाऱ्या कंत्राटदारांची बिल द्यायला तिजोरीत पैसे नाही.

मला खूप आर्थिक शिस्त आहे, मी खूप आर्थिक शिस्त पाळून काम करतो निर्णय घेतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार सगळीकडे सांगतात.

हे सरकार जाता जाता महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून महाराष्ट्राला खड्ड्यात घालत आहेत.
ती आर्थिक शिस्त आता कुठं गेली ? सरकारी तिजोरीतून कोण उधळपट्टी करत आहे हे महाराष्ट्र समोर यायला हवे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago